१७ मार्च १९६५ ,
कणकवली.
संध्याकाळ संपू लागली होती. सुमारे ७.३० वाजून गेले होते आणि गावातल्या घरांमध्ये दिवे पेटू लागले . सध्याच गावात नवीन आलेला पेट्रो मच्क्स प्रसिद्ध झाला होता.आमच्या शेणाने सारवलेल्या चार खोलीन मध्ये एखाद्या खोलीत उजेड असे.
पण आजचा दिवस वेगळा होता . आज माझासोबत माझी आई नव्हती . काल तिझे निधन झाले आणि या गोष्टीनेच आधी खूप खचलो होतो . घरातली फक्त आईच करती . बाबांचा तर ४ वर्षापूर्वीच स्वर्गवास झाला होता . मी हि तिला हात भार लावीत पण आज सर्व छोट्या भावाची जवाबदारी माझा खांद्यावर आली होती.
माझा म्याट्रिकच्या शिक्षणावर मी एका छोट्याशा कारखान्यात काम करत होतो.
घरात चौघांचे दोनच राहिले होते . हि बिकट अवस्था पाहून गावातल्या पंचायतीने आम्हाला सलग तीन दोन वर्ष प्रत्येकी तीन महिन्यात ५० रुपयांची मदत घोषित केली होती.
हि त्यांची पुण्य कर्मच, पण माझी आई तर नाही ना परत येणार? आज आईची खूप आठवण येत होती . सर्व खोलींमध्ये अंधार आणि एकाच खोलीमध्ये एका दिव्याखाली मी आणि माझा लहान भाऊ शांतपणे आईच्या आठवणीत बसलो होतो. कधी तो रडत तर कधी मी. मधूनच आईची कळवळून आठवण येत आणि छाती भरून येत.
या शांततेत अचानक माझा मनी एक गोष्ट आढळली . आई दररोज म्हणे एका बाईला जेवायला देत . ती दररोज १० वाजता अंगणा समोर येत. पण आईने आम्हाला तीझाजवळ किवा तिला बघण्यास सक्त मनाई केली होती . हे सर्व नेहमीच अचंबित वाट असे . आजही ती येईल असा अंदाज लावला . आज आई नाही म्हणजे ती भुकेली राहील आणि आईची जागा चालवण्यास मला जबाबादारी वाटली.
घडाळ्यात पहिले . ९.४५ झाले होते . आज ती बाई कोण हे समोर येईल या गोष्टीनेच मी खूप आतुर झालो होतो. भात गरम करण्यास चूल पेटवली आणि पिठलं हि तयार केल. माझे पाउल घराच्या दरवाजाच्या दिशेने धाव घेऊ लागले , भावाला तिथेच बसण्यास सक्त मनाई केली, तसेच जसे मला आई करत.
अंगणात पूर्णतः काळोख होता आणि एवढ्या काळोखात तिला कुठे शोधू हा प्रश्न. मी तिथे एक छोटा दिवा घेऊन उभा होतो तिची वाट बघत . बराच वेळ झाला काहीच कोणाचा पत्ता नाही . मी परतीला निघालो.
आणि तितक्यात काठी ठोकण्याचा आवाज येऊ लागला.
तो आवाज मोठा होत होता आणि माझ्या दिशेने वाढत होता . मला काही सुचेच ना . मनात थोडी भीती होती पण अंधारापासून काय भ्यायचे असा मनाला दिलासा दिला .
लखलखत्या नाजूक दिव्यामध्ये तिचे पाय दिसले जणू ती उलटीच चालत होती . असे का कोणी करेल तेच समजेना . ती अजून थोड्या प्रकाशात आली तर तीच चेहरा डोळ्यासमोर आला. ती उलटी नव्हती चालत , तिचे पायच उलटे होते .लांब काळेभोर केस . पूर्णतः सुख्लेले ओठ , बटाट्या सारखे मोठे गोल डोळे.आणि त्यांवर गायब असलेली भियुवे .... या सर्व गोष्टी माझा हृद्दयाची धडकी थांबवण्यास पुरेशी होती.
ती तरीही बरीच लांब होती. माझ्या
हातातले ताट कापू लागले . ती माझ्या डोळ्यात पाहत होती . माझे सर्व शरीर थबकले .... ‘असे काही होणे शक्य होते?’
तुटलेल्या बोटाने इशाऱ्याने ती जवळ बोलवत होती . मला तिथू घरात पळून जायचे होते होते पण पायात ताकदच साठवू शकत नव्हतो.
“ भाकरी दे भूख लागलीये”
असे तीझ्या एका माणसाचा फाटलेल्या आवाजात मोठ्याने मला हाक दिली. मी तरीही स्तगीतच होतो. काय करावे काहीच समजेना.
तिला माझा हातातल्या दिव्याचा उजेड सहन होत नव्हता म्हणून ती काळोखात परत आत गेली ... काही काळासाठी सर्व शांत झाले . असे वाटले ती गेली . मी होश मध्ये येत होतो आणि पाळायचा विचार केला .
पण ज्या काळोखातून ती गायब झाली त्याच काळोखातून लांब हात वेगाने येऊन माझ्या हातातल्या ताटाला गच्च पकडले . माझ्या मस्तकाची शीर हलेना आणि सर्व भुरकट दिसू लागले . माझ्या शरीराने तोल सोडला आणि सर्व अंधार झाला...